पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या

| पनवेल | वार्ताहर |

पैशाच्या किरकोळ वादातून 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी आरोपीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बेलपाडा आदिवासीवाडीमागील डोंगरावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात पडला असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता बाजूला आणि दगडावर रक्त पडलेले दिसत होते. मृत इसमाला उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाच्या शवविच्छेदनात त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची ओळख पटवली. यावेळी विकास रामलाल बोरा हा 30 ऑक्टोबर रोजी कमल या मित्रासोबत सीएसटी येथे जातो असे सांगून गेला व तो घरी परत न आल्याने नेहरूनगर पोलीस ठाणे, कुर्ला येथे तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस तपास करत असताना विकास बोरा याचा मित्र कमल ढोलपुरीया (ठक्कर बाप्पा कॉलनी पाडा नंबर दोन कुर्ला पूर्व) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पैशांच्या किरकोळ वादातून विकास बोरा याला दगडाने ठेचून मारले असल्याची कबुली दिली आणि त्याचा मोबाईल फोन फेकून दिला.

Exit mobile version