पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यातील भोवऱ्यात अडकून मृत्यू

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील डोलवहाळ धरणाच्या खालच्या बाजूस पोहायला गेलेल्या इसमाचा खोल पाण्यातील भोवऱ्यात अडकून पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान (वय वर्षे 21, रा.तळेगाव) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या कुुटुंबियांसह शुक्रवारी (10 जून) डोलवहाळ धरणाच्या खाली पुई गावाच्या हद्दीत मावशी मोमीन खातून, मावस भाऊ एजाज खान व अय्यज खान, मावस बहीण बुसरा हाफीजूर रहमान खान (धारावी) यांच्यासोबत फिरायला आला होता. नदीच्या पाण्यात पोहत असताना खोल पाण्यात भावर्‍यात अडकून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.


कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि एस.ए जाधव, पोहवा एन.जी.पवार, बंदुगडे, अशोक म्हात्रे, सय्यद राऊळ यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थ हरीश सानप संभे, अल्लाउद्दिन अधिकारी, जिक्रिया करणेकर, रा.कोलाड मोहल्ला, संजय कोळी रा.पुई आदिवासीवाडी, चंद्रकांत दळवी रा.पुई गाव यांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन मयत झालेल्या तरुणाला पाण्याबाहेर काढून दवाखान्यात आणला. परंतु त्यापूर्वीच तो मयत झाला होता.

Exit mobile version