ट्रेलरखाली येऊन युवकाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।

देवळोली येथील टाईम्स बार समोर दुचाकी चालकाचा ट्रेलरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, त्याचा सहकारी जखमी झाला असून या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दिपेश धोने (22) हाा त्याचा मित्र श्रीराम पिल्लई (29) याच्या केटीएम मोटार सायकलवरुन पनवेल बाजूकडे येत असताना ट्रेलर चालक जग्गू कोल (39) या ट्रेलर चालकाने ट्रेलर भरधाव वेगाने चालवून अचानकपणे उजव्या बाजूला घेतला. यामुळे मोटारसायकल ट्रेलरच्या मागच्या बाजूने दबली गेली आणि मागील बाजूस सापडून दोघेही खाली पडून मोटारसायकल चालक श्रीराम हा ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन त्यात गंभीररित्या जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर, दिपेश धोने हा गंभार जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version