मुरुड | वार्ताहर |
शासन निर्णयानुसार 14 जूनपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेशही सुरु झाले. नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी आधारकार्डची गरज असते तसेच असलेले आधारकार्ड अपडेट करावे लागतात परंतु वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मुरुड पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून आधार कार्ड सेवा बंद करण्यात आली आहे.
नवीन आधारकार्ड काढताना किंवा अपडेट करताना फिंगर प्रिंट्स घ्यावे लागतात, वेब फोटो घ्यावे लागतात तसेच फॉर्म भरून घ्यावे लागतात. त्यामुळे कर्मचारी व आधारकार्ड लाभार्थी दोघांचा जवळून संपर्क येतो. त्यामुळे दोघांनाही कोरोना संक्रमण होण्याचा धोका असल्याने आधारकार्ड सेवा पोस्टाच्या अलिबाग मुख्य कार्यालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत बंद केल्याचे मुरुड पोस्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले.विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची मात्र यामुळे गैरसोय झाली आहे