कामोठे येथे आधारकार्ड शिबीर

। पनवेल। विशेष प्रतिनिधी ।
कामोठे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरिता 7 दिवसीय आधार नावनोंदणी व दुरूस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यानी घेतला आहे. जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला. शिबिरात तब्बल 100 विद्यार्थ्यांची नवीन आधार नोंदणी करण्यात आली व 200 विद्यार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यात आले. मुख्याध्यापक सूर्यकांत करंजीकर व शिक्षक वृंद त्याचबरोबर पोस्टमास्टर, सब पोस्ट ऑफिस (ड.ज.) कामोठे व वाशी विभागीय कार्यालय यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सुरदास गोवारी, चंद्रकांत नवले, शांताराम भगत, सुरेश जाधव, संकेत बढे, भास्कर म्हस्के यांच्यासह भारतीय टपाल खात्याचे कर्मचारी दत्ता जायभाय, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Exit mobile version