। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील असुडगाव येथे राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार खांदेश्वर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर तरुणीचे नाव रोजी खातुन समसुद्दीन मन्सुरी, वय 16 वर्ष 10 महिने, उंची 5 फुट रंग सावळा, अंगाने सडपातळ, अंगात नेसून निळी जिन्स, दुपट्टा व निळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढऱ्या रंगाचे टिपके, नाक सरळ, चेहरा उमट, केस काळे लाम डोले काळे मध्यम, भाषा भोजपुरी व हिंदी बोलते या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे 98506 41629 यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
