| पनवेल | वार्ताहर |
नावडे फाटा तळोजे परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. सुरेखा रामचंद्र केवट (15) अंगाने मध्यम, रंग गव्हाळ, उंची 4.3 फूट, चेहरा उभट, केस काळे मध्यम वाढलेले, डोळे काळे अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. या मुलीला हिंदी व भोजपुरी भाषा बोलता येते. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27412333 किंवा स.पो.नि. नरेंद्र भास्कर कोंडे (9422594539) यांच्याशी संपर्क साधावा.