। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील भादाव गावातून फिर्यादींच्या राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोमवारी (दि.12) घडला. याबाबतची फिर्याद जयदेव गायप्रसाद श्रीवास्तव (वय 48) रा. भादाव यानी पोलीस ठाण्यात दिली.
अज्ञात आरोपीने फिर्यादी श्रीवास्तव यांच्या अल्पवयीन पीडित मुलीला तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेले. या मुलीचे वर्णन नाव बुलबुल जयदेव श्रीवास्तव (वय 14), रंग गोरा, उंची 4 फूट, अंगाने सडपातळ, सफेद रंगाचा टीशर्ट व काळ्या रंगाची जेन्स पॅन्ट, कानात टॉप्स, गळ्यात काळा दोरा, नाकात सोन्याची चमकी, डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूला मराठीत ओम गोंधळले, पायामधे चॉकलेटी रंगाची चप्पल असे आहे. या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येऊन अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री.लहांगे हे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण

Man with tied hands in low key