| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील चवदार तळे परिसरात राहणाऱ्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांना कोणतरी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींना त्यांच्या घरातून कोणीतरी फसवून नेले. या मुलींपैकी एकीचे वय 16 वर्षे असून, दुसरी मुलगीही अल्पवयीन आहे. याप्रकरणी दि.3 नोव्हेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत. तसेच, या दोन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी नागरिकांकडे उपयुक्त माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाडमधील अल्पवयीन बहिणींचे अपहरण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606