अभिरूप न्यायालय स्पर्धा

अ‍ॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विधी महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची अभिरूप न्यायालय स्पर्धा (मूटकोर्ट) आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी केले. या कार्यक्रमात मार्गदर्शक आणि परिक्षक म्हणून जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.मानसी म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

या प्रसंगी प्राचार्या डॉ. रेश्मा पाटील, उप प्राचार्या निलम हजारे आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या स्पर्धेत तीन वर्ष अभ्यासक्रमातील राकेश सावंत, प्रज्ञा शिर्धनकर, योगीराज सर्पे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ आणि पाच वर्षे विधी अभ्यासक्रमातील झेबुनिसा हसवारे, संकल्प गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक प्राप्त केले.

Exit mobile version