। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
देशभर कायदे विषयक जागरुकता व संपर्क अभियान या धोरणाअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत रांजणखार डावली येथे प्राथमिक शाळा नवखार येथे दि. 18 ऑक्टोबर रोजी शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात न्यायमूर्ती संदिप स्वामी हे अध्यक्ष होते. या शिबीरात महिलांशी संबंधित असलेले बचत गट न अन्य शासकिय योजना आणि विविध कायद्यांअंतर्गत अधिकार याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान गितांजली कटोर यांनी शासकीय योजनांचे विविध लाभ याची माहिती दिली तर महिला विषयक दिवाणी कायद्याबाबत व वारसा हक्क, मृत्युपत्र, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण या विषयावर अॅड. जयंत चेऊलकर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम आयोजित व यशस्वी करण्यात सरपंच ग्रामपंचायत रांजणखार डावली सरपंच हेमंत पाटील व माजी सभापती पंचायत समिती अलिबाग व विद्यमान सदस्य प्रकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. विक्रांत पाटील यांनी केले.