अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माडप येथील वाशिवली पारनेरकर महाराज येथे शिकत असलेल्या 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 11वीचा रिझल्ट आणण्यासाठी गेली असताना तिला भिंगार येथील विवाहित तरूण अल्पेश सुरेश नाईक याने फुस लावून पळवून नेले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात 17 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार मुलीच्या आई-वडिलांनी रसायनी पोलीस ठाण्यात केली होती.

आरोपी अल्पेश नाईक याने त्या मुलीस दांडफाटा येथे आणून सोडले. या सहा दिवसात मुलीला अज्ञात ठिकाणी ठेवून आरोपी अल्पेश नाईक याने तिच्याबरोबर अत्याचार केले असल्याचे समजले. याप्रकरणी आरोपी अल्पेश नाईक याला रसायनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिनल शिंदे करीत आहेत.

Exit mobile version