अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस मारहाण करून तिला धमकी देऊन मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून तिला फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणार्‍या इसमाविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी तालुक्यातील मोर्बे परिसरातील रहिवासी असून, तिने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version