। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू आहेत. त्यानुसार अलिबाग तहसील कार्यालयांमध्ये प्रवेश करणार्या सर्व अभ्यागतांना चेहर्यावर मास्क परिधान करणे, तसेच कोव्हिड 19 लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणार्यांनाच कार्यालयात प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तहसील कार्यालयात येणार्या अधिकारी, कर्मचार्यांसह सर्व अभ्यागतांना कोव्हिड लसीचे दोन डोस पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र प्रवेशद्वारावर पडताळणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसे आदेश तहसीलदार दळवी यांनी दिले आहेत.







