माथेरान घाटात अपघात; रस्त्यावरील खडी कारणीभूत

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ माथेरान घाट रस्त्यात आज शुक्रवारी अपघात झाल्याची घटना घडली आहे. माथेरानहून मुंबईकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाला एस वळणावर अपघात झाला. एस वळणावर रस्त्याची खडी बाहेर निघाल्याने हा अपघात घडला आहे. दरम्यान या अपघातात कारमधील पुढे बसलेल्या पर्यटकाला दुखापत झाली तर सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावले आहेत.  

नेरळ माथेरान घाटातील किचकट अशा एस वळणावर हि खडी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. अशात विकेंड जवळ आल्याने आज (दि.15) माथेरान घाट रस्त्यात पर्यटकांची वर्दळ मोठया प्रमाणात होती. तर माथेरानहून मुंबईकडे प्रवण टूर्सची कारमध्ये कुटुंब घेऊन सकाळी 10 वाजता ते माथेरानहून निघाले. एस वळण येथे आले असता समोरून वाहन खडीवरून घसरून वरती येण्याचा प्रयत्न करत असताना हि कार देखील खडीवरून ब्रेक दाबल्याने घसरली. त्यामुळे बाजूच्या संरक्षक कठड्याला कारचा कोपरा लागून कार बाजूच्या एका झाडाला जाऊन ठोकली. या अपघातामुळे कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्या. तर  चालकाच्या बाजूला बसलेल्या पर्यटकाला दुखापत झाली. सुदैवाने मागे बसलेल्या महिलेला व मुलाला कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, रस्त्यावरील निघालेली खडी बाजूला करण्यात यावी अशी मागणी नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेकडून करण्यात येत आहे. तर करोडो रुपये खर्च करूनही पर्यटनस्थळाचे रस्ते धड होत नाहीत अशी शोकांतिका पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे. 

नेरळ माथेरान घाट रस्त्यात मार्च मध्ये रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरु केले तेव्हाच आम्ही त्यांना काम नीट करा असे सांगितले होते. मात्र पावसाळ्यात या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावरील डांबर निघून जात अनेक ठिकाणी खडी बाहेर आली आहे. मात्र तरीही ती खडी बाजूला केली जात नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ती खाडी तात्काळ बाजूला करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. 

नरेंद्र कराळे, वाहन चालक, नेरळ माथेरान टॅक्सी संघटना

Exit mobile version