मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

एक जण गंभीर; तर काही किरकोळ जखमी
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्यापासुन 2 किलोमीटर अंतरावर एका आराम बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एक जण गंभीर जखमी झाला आहे तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याकडून मुबंईकडे प्रवासी घेऊन बस जात असताना ती आडोशी गावाजवळ आली असता बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. यात बसमधील एक जण गंभीर जखमी झाला असुन काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, सेव्ह लाईफ, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, आणि अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य करीत आहेत. हा अपघात घडताच पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनीही आपल्या सहकार्यांसमवेत मदत केली.

Exit mobile version