| नेरळ | प्रतिनिधी |
मुरबाड-कर्जत या राष्ट्रीय महामार्गवर कर्जत तालुक्यातील भागुची वाडी येथे सुझुकी ब्रिझा गाडीने दोन दुचाकींना धडक दिली. त्यावेळी त्या दोन दुचाकी तिसऱ्या दुचाकीवर जाऊन आदळल्या. या विचित्र अपघात पहिल्या दोन दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले असून, तिसऱ्या दुचाकीवरील चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची तसदी न घेता कार चालक पळून गेला असून, याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरबाड जवळील जडई गावातील अरुण लक्ष्मण देशमुख हे आपली ब्रिझा गाडीमधून मुरबाड दिशेकडून कर्जत दिशेकडे येत होते. मुरबाड -कर्जत महामार्गवरील कर्जत तालुका हद्दीत कामधंदा करून मुरबाड तालुक्यातील वडाची वाडी येथील मजूर आपल्या घरी परतत होते. सोमवारी (दि.17) रोजी सायंकाळी कर्जत तालुका हद्दीत भागुची वाडी येथे हे मजूर आपल्या दुचाकीवरून जात असताना ब्रिजा कार चालक मुरबाड बाजूकडून कर्जत बाजुकडे भरधाव वेगात, हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने विरुद्ध दिशेने चालवत जात असताना अपघात झाला. त्यावेळी कर्जत बाजूकडून मुरबाड बाजूकडे येणाऱ्या या दोन दुचाकींना धडक दिली. त्याचवेळी त्याच वडाची वाडीमधून तरुण दुचाकीने पाठीमागून येत होते. ब्रिझा गाडीने अपघात केलेल्या दोन्ही दुचाकी तिसऱ्या गाडीवर जाऊन आदळल्या आणि अपघाता झाला. या अपघातामध्ये पहिल्या दोन मोटार सायकलवरील चार जणांना लहान-मोठया स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. तर त्यातील तिसरी मोटार सायकलवरील चालक धनाजी हनुमंत सोंगाळ यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील चालक अरुण सोंगाळ, विष्णू सोंगाळ, बबलू मेंगाळ आणि विजय मेंगाळ हे चौघे जखमी झाले असून, त्यांच्यावर मुरबाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यावर जखमी यांना रुग्णालयात नेण्याची माणुसकी ब्रिझा कार चालक याने दाखवली नाही आणि पळून गेला. त्यामुळे त्याच्यावर धनाजी सोंगाल याच्या मृत्यू प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ब्रिझा चालक यांच्या शोध नेरळ पोलिस घेत असल्याची माहिती नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.