देवदर्शनाहून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात

| तुळजापूर | प्रतिनिधी |

लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन कारमधील पाचजण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उदगीर येथून कुटुंब कारने सकाळी 8.30 च्या सुमारास निघालं होतं. कारमधून सहाजण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणार्‍या एसटी बसवर जाऊन धडकली.

अपघातानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्‍वर गुंडेकर अशी त्यांची नावं आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version