। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मुंबई – गोवा महामार्गावर, तोरसे बीएड कॉलेज नजीकच्या धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरुन नोकरीनिमित्त जाणार्या कुडाळ येथील योगेश परब या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या मोटरसायकलची समोरुन सुसाट वेगात येणार्या कंटेनरला धडक बसली. ग्रामस्थांसह पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.