| पनवेल | वार्ताहर |
अज्ञात वाहन चालकाने 31 वर्षीय तरुणाला ठोकर मारून अपघात केल्याने त्यात अखिलेश नंदलाल कुमार याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. साडेअकराच्या सुमारास शिळफाटा पनवेल हायवे रोडवर बीमा कॉम्प्लेक्स समोर एका अनोळखी इसमाचा अपघात होऊन तो जखमी अवस्थेत पडला होता. यावेळी अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याला उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तरुणाचा अपघाती मृत्यू
