टेम्पो-अ‍ॅक्टिव्हामध्ये अपघात; एक ठार, एक जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड औद्योगिक परिसरातील प्रिव्ही कारखान्यासमोर महिंद्रा टेम्पो आणि अ‍ॅक्टिव्हामध्ये झालेल्या अपघातात अ‍ॅक्टिव्हा चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रस्त्यावर असलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे घडून आला असल्याची चर्चा औद्योगिक परिसरात केली जात आहे.

गुरुवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडकडे येणारा महेंद्र टेम्पो क्रमांक एम. एच. 43 बी.एक्स. 4507 हा महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही कारखान्या समोर आला असता त्याच दिशेला येणारी अ‍ॅक्टिव्हा क्रमांक एम. एच. 06 बी.जे. 9953 वरील चालक ज्ञानेश्‍वर प्रभाकर फडतरे (रा.महाड) यांचा ताबा सुटला व टेम्पोच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच मरण पावले, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वर्षा फडतरे या गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version