। रसायनी । राकेश खराडे ।
दांड रसायनी रस्त्यावरील रिस गुरुव्दारजवळ टॅकरवर टेम्पो आदळल्याने मोठा अपघात झाला.यात टाटा टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की टॅकर नंबर एम एच -46,बीएम -2796 हा मिथेनाॅल भरुन रसायनीकडे निघाला असताना रिस गुरुव्दारजवळ आला असताना समोरून येणारा टाटा एस टेम्पो छोटा हत्ती एम एच -43,बीबी -1935 हा दांडकडे जात असताना टॅकर नंबर एम एच -46,बीएम -2796 यांस समोरुन ठोकर मारल्याने दोन्ही वाहनांची समोरील बाजूचे अपघातात नुकसान झाले आहे.तर टाटा एस टेम्पोचालक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी पनवेलमध्ये दाखल करण्यात आले आहे.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सरोदे अधिक तपास करीत आहेत.