मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे
। उरण । वार्ताहर ।
उरण पोलीस कोठडीतील मृत आरोपी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती उरण पोलिसांनी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. जमीनीच्या वादातून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपी कैलास म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे. संशयास्पदरित्या मृत्यू परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात आवश्यकतेनुसार सर्वोतोपरी सहकार्य केले. आरोपीला आधीपासुनच फिट येत होती. कोठडीतच असलेल्या अन्य भावांसमक्ष फीट येण्याचा प्रकार घडला. नवीमुंबई आयुक्त बिपीन कुमार सिंह,डीसीपी शिवराज पाटील, एसीपी क्षीरसागर आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती व पोलीस सुनील पाटील यांनी दिली