कल्याण-कर्जत रस्त्यावर अपघात

| नेरळ | प्रतिनिधी ।

बदलापूर येथील कार शनिवार दि. 22 रोजी कल्याण-कर्जत रस्त्याने प्रवास करीत असताना देऊळवाडी येथे अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारचे एअर बॅग खुल्या झाल्याने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.


बदलापूर येथील कुटुंब टाटा अल्ट्रोज (एमएच-05-एफए-2288) या कारने पुण्याकडे निघाले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कार कल्याण कर्जत रस्त्याने प्रवास करीत असताना देऊळवाडी गावाच्या हद्दीत डी मार्ट पुढे जात असताना वाहनचालकाचे आपल्या मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली जाऊन हा अपघात झाला. कार रस्त्यापासून 10 मीटर दूर अंतरावर जाऊन थांबली. त्या ठिकाणी असलेल्या झाडी झुडपामुळे कार विजेच्या खांबाला धडकली नाही आणि त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली. या अपघातात गाडीचे एअर बॅग उघडले आणि त्यामुळे प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही.   

Exit mobile version