Mapgaon Murder Case: हत्या करणारे गजाआड

|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मापगाव येथील विजय उर्फ बाबू थळे यांच्या डोक्यावर पोकलनच्या ब्रेकरने वार करण्यात आला. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन ठार झाले. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासातच अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निकेश दळवी आणि आशिष दळवी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. खाणीमधून दगड माती विनापरवाना काढून विकू नये, याच्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक यशवंत कदम करत आहेत.

Exit mobile version