| दोडामार्ग | प्रतिनिधी |
विजघर येथे गोवा बनावटीच्या अवैध मद्याची वाहतूक करणार्या एकावर स्थिर सर्वेक्षण पथकाने कारवाई केली. या कारवाईत एकूण 8 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी विनोद धर्माप्पा दोडमणी (35, रा.निलननगर, शिरुर, जि. बागलकोट-कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद दोडमणी हा टाटा कँटर घेऊन गोव्याहून विजघर मार्गे कर्नाटकच्या दिशेने जात होता. विजघर येथील तपासणी नाक्यावर तो आला असता स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणीसाठी थांबविला. यावेळी कँटरची झडती घेतली असता आतमध्ये गोवा बनावटीचे मद्य आढळले. यात गोवा काजू फेणी लेबलच्या 180 मिली मापाच्या 75 रु. किमतीच्या 144 बाटल्या होत्या. याची किंमत 10 हजार 800 रुपये व 8 लाख किमतीचा कँटर असा मिळून 8 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू वाहतूक प्रकरणी चालक विनोद दोडमणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.