दोन चिमुकली मुलं गंभीर जखमी
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
ऐनापूर येथे शुक्रवारी (दि.22) रात्री साडेआठ वाजता कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पती, पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा राजवीर (3), मुलगी अन्वी (6 महिने) गंभीर जखमी झाली आहेत.
आदर्श युवराज पांडव (27) व शिवानी आदर्श पांडव (22) अशी मृतांची नावे आहेत. पांडव कुटुंबीय ऐनापूर (कागवाड, कर्नाटक) येथे लग्नासाठी गेले होते. लग्नसोहळा आटोपून सर्वजण करनूरकडे परतत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कागवाडनजीक कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याकडेच्या नाल्यात कोसळली. गाडीचा पुढील भाग दलदल व पाण्यामध्ये गेला. त्यामुळे दलदलीमध्ये अडकलेल्या मोटारीतील पांडव दाम्पत्याचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर मुले राजवीर व अन्वीसह मोटारीत बसलेले नातेवाईक जखमी झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.