कर्कश आवाजाने मोटार चालविणार्‍यांवर कारवाई


| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार कर्कश असे सायलेंन्सरद्वारे आवाज काढून गाड्या चालवितात, त्याच प्रमाणे वाढदिवस व इतर कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करताना चार चाकी गाड्यांमध्ये स्पीकरवर मोठमोठ्याने गाणी लावतात, अशांवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली आहे.

याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. अशा घटनांमुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो व या कर्कश आवाजाचा त्रास प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना तसेच, शालेय विद्यार्थ्यांना होतो. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जुईकर व गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गस्त घालून अशा प्रकारे कर्कश आवाजाने मोटार सायकल चालविणार्‍या मोटार सायकलींवर त्याचप्रमाणे एका चार चाकी वाहनांना ताब्यात घेवून त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाई केली आहे.

Exit mobile version