| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाण्यात सायबर विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार धीरज नारायण थवई यांना नुकताच पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक पोलीस पदक त्यांना नुकतेच मिळाल्याबद्दल पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार आज वपोनि नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस हवालदार धीरज थवई यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात असताना विविध विभागात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेवून त्यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक बहाल करण्यात आले. याबद्दल आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.