अनधिकृत टपर्‍यांवर अतिक्रमण कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहरात सुशोभिकरण अभियानांतर्गत वृक्षारोपण करून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानूसार एमजीएम रूग्णालयासमोरील अनधिकृत टपर्‍यांवर महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली.

महानगरपालिका प्रभाग समिती क मधील एमजीएम कामोठे रूग्णालयासमोर अनधिकृतरित्या सुरू असलेले व्यवसाय, शेड, टपर्‍या निष्कसित करण्यात आल्या. सदर कारवाईवेळी उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रभाग ब चे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, प्रभाग क चे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील व प्रभाग ब आणि क चे अतिक्रमण पथक उपस्थित होते. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतरित्या उभारलेल्या टपर्‍यांवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचे सामान जप्त करण्यात आले.

Exit mobile version