बूस्टरपंप बसविल्यास कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी जलवाहिनीवर पाणी खेचण्यासाठी बूस्टरपंप बसवले. त्यामुळे ज्या गृहनिर्माण संस्थांनी बूस्टरपंप बसवले नाही त्यांना थेंबभर सुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याने लाखो रुपये खर्च करुन या गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी खरेदी करावे लागते. बेकायदा बूस्टरपंपवर नियंत्रणासाठी सिडको मंडळाने मंगळवारपासून खास मोहीम हाती घेऊन खारघर वसाहतीमधील सेक्टर 34, 35 येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी लावलेली बूस्टरपंर हटवले.

खारघरप्रमाणे कळंबोली, कामोठे, पनवेल, करंजाडे, द्रोणागिरी या नोडमध्ये ही कारवाई केली जाईल अशी माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे. सिडकोने गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिका-यांना स्वताहून बूस्टरपंप हटविण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या शोध मोहीमेमध्ये बूस्टरपंप गृहनिर्माण सोसायटीने लावल्याचे आढळल्यास संबंधित गृहनिर्माण सोसायटीवर कायदेशीर कारवाई करु असा इशारा सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिला आहे.

Exit mobile version