। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगर पालिका हद्दीतील पटवर्धन हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या एका सोसायटीच्या प्लॉटवर काही हफ्तेखोरांनी बिनधास्तपणे टपरी, उसाचा रस दुकान व इतर दुकाने थाटली होती आणि ती चक्क भाड्याने देऊन एक प्रकारे हफ्तावसुली करीत होते.
याबाबत दुकादारांना विचारणा केली असता बिल्डरची जागा आहे आमही काही पण करू, आम्ही इथले भाई आहोत अशी उत्तरे दिली. याबाबत पत्रकारांनी पनवेल महापालिका आयुक्त यांना हि गोष्ट निदर्शनास आणून दिली आणि आयुक्तांनी क्विक ऍक्शन घेऊन हि सर्व अतिक्रमण तोडून टाकली. आयुक्तांच्या या तोडकी कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून गेले अनेक महिने यांचा त्रास हॉस्पिटल तसेच आजूबाजूच्या सोसायट्या व इतर सर्वसामान्य लोकांना होत होता.
पनवेलमधील अतिक्रमण जमीनदोस्त आयुक्तांची कारवाई
