। पनवेल । वार्ताहर ।
नविन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असल्याने बुधवारी सिडको अतिक्रमण विभागाकडून नविन पनवेल सेक्टर 14 मधील बेकायदेशीर मासे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली तसेच ई वन परिसरात आमराईच्या मागील बाजूस रहिवाशांनी मोकळ्या भूंखडावर बेकायदेशीर चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी शेड उभे केले होते त्यांच्यावर सुध्दा सिडको अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या बेकायदेशीर शेडला सिडको अतिक्रमण विभागाकडून आठ दिवसापूर्वी नोटीस दिली गेली होती अस नागरिकांनी सांगितले आहे.