बेकायदेशीर जुगारावर कारवाई

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील प्रधान डाककार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमधील आंब्याच्या झाडाखालील टपरीत बेकायदेशिरपणे जुगार चालविणार्‍या एका संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन गजानन सातपुते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 904 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणातीलअधिक तपास पोलिस नाईक मोहिते करत आहेत.

Exit mobile version