| पनवेल | प्रतिनिधी |
उलवे परिसरात शासनाने दारू विक्रीचे परवाने दिले नसल्याने दारूविक्री ही थेट पानटपऱ्या आडून सुरू असते. अशाच टपऱ्यांवर सिडकोने बुलडोझर फीरवून टपऱ्या उद्घ्वस्त केल्या आहेत. याच कारवाई दरम्यान विना परवानगी बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने कारवाई करत वॉशिंग सेंटर, पत्राशेड आणि दारूचे अड्डे देखील पाडून टाकले आहेत. ही कारवाई सिडको मंडळाच्या मुख्य दक्षता अधिकारी सूरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) विभागामार्फत उलवे नोडमधील सेक्टर 23 येथील प्लॉट क्रमांक 44, 58 आणि 139 तसेच सेक्टर 2 मधील प्लॉट क्रमांक 148 आणि सेक्टर 3 मधील मोरावे गाव कमानीजवळ विना परवानगी उभारण्यात आलेल्या संरचनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. सिडकोचे अनधिकृत बांधकामे विभागाचे क्षेत्रिय अधिकारी अमित राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कारवाईत स्थानिक पोलीस अधिकारी, सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक या कारवाईत सहभागी झाले होते.
उलवेत दारू टपऱ्यांवर कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606