पनवेलमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांच्या संयुक्त मोहीम
| पनवेल | प्रतिनिधी |
मीटरप्रमाणे भाडे न घेण्याचा विडा उचललेल्या रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पनवेल वाहतूक विभागाने संयुक्तिक कारवाईच्या मोहिमेला गुरुवार (दि. 8) पासून प्रारंभ केला. पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शहरांमध्ये रिक्षा चालकांची भाड्याविषयी स्वतंत्र नियमावली आहे. ते बोलतील ते भाडे आणि ते सांगतील तसे प्रवशांनी निमूटपणे वागायचे असा त्यांचा खाक्या आहे. त्याविरोधात प्रचंड जनआक्रोश धुमसत आहे.
प्रवाशांच्या तक्रारीवरून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी नुकतीच यासंदर्भात आरटीओ, वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या उच्चस्तरीय अधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज पनवेल शहरात कारवाईला प्रारंभ झाला आहे. आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या अधिकार्यांनी कडक शिस्तीचा बडगा उगरला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात आनंदाची लहर उमटली आहे. मात्र, ही कारवाई टकलादू ठरू नये. ही मोहीम दीर्घकाळ चालली तर बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांना आळा बसेल, अशी प्रवशांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.