अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच नवीन पनवेल बाजूच्या फूटपाथवर बसणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली. या फेरीवाल्यांमुळे फूटपाथवरून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची गैरसोय होत होती. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यावेळी जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृतरित्या उभारलेल्या शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. याचबरोबर काळुंद्रे आणि भिंगारी येथील रोडवरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग ‘अ’ खारघर मध्ये सेक्टर 34 मधील शीघ्र कृती दलाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला काही फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या पक्के शेड उभारले होते. या अनधिकृत उभारलेल्या दुकानांवर, शेडवरती महापालिकेच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने इथे उभारलेली अनधिकृत दुकाने व शेड जमीनदोस्त करण्यात आली.

Exit mobile version