श्रीवर्धन पोलीसांनी दिले आदेश
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
आजकाल रस्त्यांवर मोकाट फिरणार्या घोडे, गायी, बैल यांची संख्या वाढलेली दिसते. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढण्याची शक्यता असते. या समस्येवर चर्चा करुन उपाययोजना करण्यासाठी श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच, उप सरपंच व पोलीस पाटील यांची एक सभा नुकतीच श्रीवर्धन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
सभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन सदरचे पाळीव प्राणी ज्या मालकांचे आहेत. त्यांनी त्यांचा वेळीच बंदोबस्त करायचा आहे. जेणेकरून कोणतेही अपघात होणार नाहीत. त्याबाबत आपापल्या गावांत दवंडी फिरवून ज्यांची गुरे आहेत. त्यांनी त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा संबंधीत गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येईल अशी समज सभेमध्ये सर्व संबंधितांना देण्यात आली. सभेमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.