। अलिबाग । वार्ताहर ।
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे महाव्यवस्थापक नवीनचंद्र झा यांनी अलिबाग येथील समर्थ वृद्धाश्रमाला भेट दिली.
बँकेने कोव्हिड अव्हेरनेस किट अर्थात कोव्हिडबाबत जनजागृती करणारी साधने वृद्धाश्रमाला दिली. यावेळी स्टेट बँकेचा अधिकारी वर्गही उपस्थित होते. यावेळी झा यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी खर्या अर्थाने सामाजिक असणार्या संस्थांना दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. उत्तरदायित्वासाठी वृद्धाश्रमाच्या गरजा जाणून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. मदतीची खरी गरज वंचितांसाठी काम करणार्या समर्थ वृद्धाश्रमाला आहे, असे ते म्हणाले. समर्थ वृद्धाश्रमाचे संचालक अॅड. जयेंद्र गुंजाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहितीही दिली.
यावेळी विभागीय व्यवस्थापक विपिनकुमार पांडे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक श्रीकुमार परिमल प्रेम आणि अलिबाग शाखा व्यवस्थापक आणि कर्मचारीही उपस्थित होते.