कर्जतमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

| कर्जत | प्रतिनिधी |
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला. भाजपाच्या वतीने कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात कार्यकर्त्यांनी अजित पवार, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. टिळक चौकात झालेल्या आंदोलनात मंगेश म्हसकर ,दीपक बेहेरे, ,सुनील गोगटे, संजय कराळे, अ‍ॅड. हृषीकेश जोशी, स्नेहा गोगटे, किरण ठाकरे, प्रमोद पाटील, शिरीष कदम, गायत्री परांजपे, प्रदेश खेडकर, दिनेश भरकले ,बळवंत घुमरे, विनायक पवार, विजय कुलकर्णी, सुनील पाटील, विभाग अध्यक्ष योगेश घारे, केशव तरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version