कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा- पंडीत पाटील

। रोहा । प्रतिनिधी ।

आगामी काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. शेकापचा कार्यकर्ता हा विचाराने पक्का आहेच पण शेकापच्या विचारधारेवर प्रेम करणारा मतदार देखील रायगड जिल्ह्यात असल्याने आगामी काळात जनता आपल्याला भरघोस मतदान करणार असल्याचा विश्वास याप्रसंगी पंडीत पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावर गणेश मढवी, नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले, विनायक धामणे, शिवराम महाबळे, नंदेश यादव तसेच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात तांबडी येथील नंदकुमार शिंदे यांनी पंडीत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

रोहा तालुक्यातील खांबेरे येथील स्वयंभू वैजनाथ मंदिरात श्रावणी सोमवारचे औचित्य साधत माजी आमदार पंडीत पाटील यांनी सपत्नीक दर्शन घेऊन अभिषेक केला. याप्रसंगी तालुका चिटणीस राजेश सानप, बाजारसमिती संचालक काशिनाथ भोईर, जितेंद्र जोशी, संदेश विचारे, लियाकत खोत, बबन पडवळ, समीर वारगुडे, दिपक गिजे, संतोष देवळे, विकास भायतांडेल यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व खांबेरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version