| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी चित्रपट सृष्टीतील हसरा चेहरा, गिरगावकर आणि पाय जमिनीवर असेलेले अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे मंगळवारी ( दि.९) पहाटे गिरगाव ठाकूरद्वारच्या राहत्या घरी निधन झाले.
मोरूची मावशी हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक होते. याशिवाय मालिका, चित्रपट, नाटकात त्यांचा सहभाग होता. अस्सल गिरगावकर असलेलया पट्याला कधीच गिरगाव सोडण्याचा मोह झाला नाही. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील हसरा चेहरा काळाच्या पडद्याआड; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
