अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या करत स्वतःच जीवन संपवले आहे. राहत्या घरात गळफास घेत अभिनेत्रीने आत्महत्या केली असून, या घटनेमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगाले (30) हिने आत्महत्या केली आहे. नालासोपारा पूर्व येथे अचोले पोलीस स्थानक परिसर येथील ही अभिनेत्री रहिवासी आहे. रविवारी (दि.14) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी कसलीही सुसाईड नोट सापडली नसून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्री संचिता उगाले हिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. कुमकुम भाग्य, वागले की दुनिया, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशा अनेक मोठ्या शोमध्येही तिने काम केले. तसेच, विक्की कौशलच्या छावा या चित्रपटातही तिने ताराबाई ही भूमिका साकारली होती.

Exit mobile version