| अलिबाग | प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 2022-23 या आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसायाचा 500 कोटी रूपयांचा पल्ला ओलांडला आहे. आदर्श पतसंस्थेने 508 कोटी 10 लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 4 कोटी 81 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. ग्रॉस एनपीए 0.88 टक्के असून, नेट एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.
आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवी 302 कोटी 91 लाख रुपये असून, 205 कोटी 19 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेचा निव्वळ नफा 4 कोटी 81 लाख रुपये झाला आहे. 117 कोटी 74 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. संस्थेचे भागभांडवल 15 कोटी 2 लाख रुपये आहे. मागील वर्षी आदर्शचा एकत्रित व्यवसाय 422 कोटी 96 लाख होता. नफा 3 कोटी 69 लाख रुपये झाला होता.
संस्थेने मोबाईल अॅप, क्यू आर कोड यासारख्या सुविधा ग्राहकांना चालू केल्या आहेत. मोबाईल अॅपमधून फंड ट्रान्सफर, आर्टिजीएस, नेफ्ट, आयएमपीएस, मोबाईल रिचार्ज, डिशटीव्ही रिचार्ज, वीज बिल भरणा सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आदर्शच्या पेण व उरणसह शाखा 16 आहेत. रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे, अशी महिती अभिजीत पाटील यांनी दिली.
आदर्शचे सभासद ठेवीदार, ग्राहक ,हितचिंतक, संचालक मंडळातील सहकारी, सल्लागार, आर्थिक सल्लागार श्री. वाणी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी, कायदेविषयक सल्लागार यांच्यामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो, असे आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.