सातारची आदिती स्वामी तिरंदाजीत विश्वविजेती

महाराष्ट्रीय कन्येचा जगात डंका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्याच महिन्यात ज्युनिअर गटात जग्गजेती ठरलेली साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी हिने विश्वविक्रम करत शिरपेचात आणखी एक मोठा मानाचा तुरा खोवला. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात ती विश्वविजेती ठरली. याच गटात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने ब्राँझपदक मिळवून भारताची मक्तेदारी सिद्ध केली. 17 वर्षीय आदितीची ही आणखी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. वैयक्तिक गटात जग्गजेती ठरणारी ती भारताची पहिली महिला तिरंदाज ठरली. कंपाउंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात आदितीने दोन वेळच्या जागतिक पदक विजेत्या मेक्सिकोच्या अँड्रिया बेकेरा हिचा 149-147 असा पराभव केला. ज्युनिअर आणि सिनिअर विश्वविजेतेपद मिळवणारी ती पहिली तिरंदाजही ठरली.

16 वे मानांकन असलेल्या अँड्रिया हिने विद्यमान विश्वविजेत्या सारा लोपेझचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव केला असल्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या; परंतु आदितीचा सामना करणे तिला कठीण झाले. सहाव्या मानांकित आदितीने पहिले तीन बाण जवळपास अचूकतेच्या अगदी जवळ मारत 30-29 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या चार राउंडमधील 12 बाण अचूक लक्ष्यभेद करणारे ठरले.

सध्या कमालीच्या फॉर्मात असलेल्या आणि अचूक लक्ष्यभेद करत असलेल्या आदितीने हा सामना 149-145 असा जिंकला. आदितीकडून झालेल्या या पराभवातूनही सकारात्मक ऊर्जा घेणाऱ्या ज्योतीने त्यानंतर ब्राँझपदकाच्या लढतीत तुर्कस्तानच्या इपेक तोम्रुर हिच्यावर 150-146 अशी मात केली.

शिष्यांच्या कामगिरीने गुरु झाले धन्य
सातारा येथील रहिवासी असलेली अदिती शनिवारी वयाच्या 17 व्या वर्षी सर्वात तरुण ज्येष्ठ विश्व विजेती बनली, जेव्हा तिने बर्लिन येथे जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड महिला सुवर्णासह भारताचे पहिले वैयक्तिक विजेतेपद पटकावले. त्यानंतर ओजस देवतळे देखील 150 च्या अचूक स्कोअरसह कंपाऊंड पुरुषांचे विजेतेपद जिंकून जगज्जेते ठरला. या दोघांनी सातारा येथील पोलीस हवालदार प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. तिच्या यशाने सावंत हे कमालाची भारावून गेले.केलेल्या कष्टाचे चीज झाले,अस त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण सांगितले. ते म्हणाले. अदिती जेव्हा माझ्याकडे आली होती, तेव्ही ती अप्रभावी होती. त्यावेळी आदिती 10 वर्षांची सड-पातळ मुलगी होती. पण तिच्या जिद्दीने माझे लक्ष वेधून घेतले आणि हा प्रवास सुरू झाला. ती खरोखर मेहनती होती, स्पर्धेनंतरही ब्रेक घेत नसत आणि तासनतास इथे सराव करत असे. ती एक भावी चॅम्पियन आहे, हे मला माहीत होते. देवतळेबद्दल बोलताना सावंत म्हणाले, त्याचे तिरंदाजी अपारंपरिक पण प्रभावी होती. मला फक्त त्याला प्रेरित करायचे होते आणि त्याला मानसिकदृष्ट्‌‍या तयार करायचे होते. बाकीचे काम त्याने केले.

Exit mobile version