भारताला मालिका बरोबरीत आणण्याचे आव्हान
| बर्लिंघम | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून, त्यातील दुसरा सामना 2 ते 6 जुलै दरम्यान बर्लिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 गडी राखून विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचे आव्हान भारतीय संघा समोर असणार आहे. मात्र, भारतीय संघाच्या विजयाच्या मार्गात केवळ इंग्लंडचा संघच नाही तर पाऊस सुद्धा अडथळा आणू शकतो. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान बर्लिंघम येथील हवामान कसे असेल, याविषयी माहिती समोर येत आहे.
एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आले आहे. तेव्हा शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करते हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 60 कसोटी सामने खेळवण्यात आले असून या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये सरासरी स्कोअर 302 धावांचा राहिला आहे. तर, दुसऱ्या इंनिंगमध्ये सुद्धा सरासरी स्कोअर 302 धावा हा आहे. तथापि, चौथ्या इनिंगमध्ये खेळपट्टी कठीण होते. शेवटच्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या ही 157 धावा आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे येथील हवामानाची देखील महत्वाची भुमीका ठरणार आहे.
हवामानाची महत्वाची भुमीका
बर्मिंघममधील हवामानाबाबत चांगली माहिती समोर आलेली नाही. दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान मधून मधून पावसाचे आगमन होऊ शकते. लीड्स कसोटीत सुद्धा काही सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु, तसे झाले नाही. पावसाच्या हलक्या सरी पडल्या, मात्र त्याचा सामनावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसे असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बर्मिंघम हवामान अहवाल
बर्मिंघमच्या हवामान अहवार्लानुसार, 2 जुलै म्हणजेच पहिल्या दिवशी स्थानीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30) वाजता खेळ सुरु होण्यापूर्वी पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर स्थितीत सुधार होऊ शकतो. बर्मिंघममध्ये अधिकतर चांगले वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु, सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.