। रायगड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक संदिप अभिमन्यू बागुल, राखीव पोलीस उप निरीक्षक संजय दिनकर साबळे, पोलीस उप निरीक्षक तानाजी रामचंद्र वाघमोडे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक मोहन दत्ताराम बहाडकर, श्रेणी पोलीस उप निरीक्षक गजानन पांडुरंग म्हात्रे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक गणेश अंकुश भिलारे, सहाय्यक फौजदार नितीनकुमार धोंडू समजिसकर, सहाय्यक फौजदार राजेश दत्तात्रेय मारकंडे,सहाय्यक फौजदार जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक फौजदार सुखदेव यशवंत सुर्यवंशी, सहाय्यक फौजदार जितेंद्र दामोदर साटोटे, सहाय्यक फौजदार नरेंद हासू म्हात्रे, सहाय्यक फौजदार किशोर गजानन गुरव, सहाय्यक फौजदार सुभाष पोसुराम म्हात्रे, सहाय्यक फौजदार ललीतकुमार वसंत कडू, पोलीस हवालदार अतुल रामचंद्र वडकर, पोलीस हवालदार संतोष नामदेव चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश रामा हालेखाना, पोलीस शिपाई रितेश बाळकृष्ण यादव, पोलीस शिपाई संकेत सुधीर पाटील (खेळाडू), पोलीस शिपाई शनिराज हणमंत हारगे (खेळाडू) यांचा समावेश आहे. यावेळी अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रितेश राजाराम पाटील, बस्वाराज बिडवे यांचा सन्मान केला.