उद्या आदित्य ठाकरे उरणमध्ये

। उरण । वार्ताहर ।

मावळ लोकसभेचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार संजोगभाऊ वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. उरण शहरातील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका प्राथमिक शाळेच्या मैदानात गुरुवारी (दि. 9) सायंकाळी ठीक 6 वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शेकाप आमदार जयंत पाटील, शरद पवार राष्ट्रवादी आमदार रोहित पवार, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी महाविकास आघाडीच्या तथा इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आह

Exit mobile version