| पनवेल | प्रतिनिधि |
पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याच्या कायदेशिर रखवालीतुन पळवून नेल्याची घटना घडली आहे. उसर्ली खुर्द येथील अनुकुल रेसीडन्सी मध्ये राहणार्या सुरेश जाधव यांचा मुलगा सुजल याला कोणत्यातरी अज्ञात इसमाने त्याच्या कायदेशिर रखवालीतुन पळवून नेले आहे. उंची 5 फुट, रंग सावळा, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे असे सुजलचे वर्णन आहे. तसेच त्याला मराठी, हिन्दी भाषा बोलता येते. या मुलासंदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेटे (मो.8605188100) यांच्याशी संपर्क साधावा.
अल्पवयीन तरुणाचे अपनयन
