ॲड. तुषार भवारे यांची बिनविरोध निवड

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत दिवाणी न्यायायलातील कर्जत बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ॲड. तुषार भवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ॲड. मनोज क्षीरसागर यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

कर्जत दिवाणी न्यायालयातील वकिलांची सर्वात जुनी संघटना म्हणून ओळख असलेल्या कर्जत ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सन 2024-25 या वर्षाच्या अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया सोमवारी (दि.05) पार पडली. अध्यक्षपदाकरीता ॲड. तुषार भवारे व ॲड. मनोज क्षिरसागर यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. ॲड. मनोज क्षिरसागर यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे ॲड. तुषार भवारे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ॲड. अजय मेढी यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले. या निवडणुक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांना जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजेंद्र निगुडकर, ॲड. आर.बी. पाटील, ॲड. ए.पी.डिमेलो, ॲड. नवीन बदले, ॲड. अरुण नायक, ॲड. एम.जे. ओसवाल ॲड. पुजा कोंडेकर, ॲड. दिपाली शिंदे या सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version